भजनी मालिका
← भजनांकडे परत

न धरी आतां शंका । कशासाठी भिऊं लोकां

na dhari atan shanka | kashasathi bhiun lokan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
न धरी आतां शंका । कशासाठी भिऊं लोकां ॥१॥ ज्याचें ओझें तयावरी । मज हे ऐशी काय थोरी ॥२॥ सांगितलें करुं काज । ज्याची तया चिंता लाज ॥३॥ निळा म्हणे गेलो भेवो । जाणोनि साह्य पंढरिरावो ॥४॥