भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

वारंवार देही हेचिं पैं वासना । अखंड चरणा घालीन मिठी ॥१॥ हा माझा नवस आठवीन पाय । आणिक तें कांहीं नेणें दुजें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वासनेंचे वसन समूळ फाडी । त्रिगुण जानवेंक तयावरी तोडी ॥१॥ यापरी जाणोनी संन्यासु घेई । गुरुवचनें सुखें विचरतु जाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वासुदेव नाम प्रातःकाळीं वाचे । धन्य जन्म त्यांचें सुफळ सदा ॥१॥ वाहतां टाळीं मुखीं नाम सार । वासुदेव उच्चार करी आधीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विकल्प वासना समूळ दे टाकुनी । मग तुज भजनी सुख बापा ॥१॥ आशापाश मोह सांडी तूं निराळा । भजन तें गोपाळा प्रिय वाटे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विचारावेंविवेक दृष्टी । संतचरणीं द्यावीं मिठी ॥१॥ तेणें चुके जन्मजरा । चुकवी चौर्‍यांशींचा फेरा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विचारितां तुज नामाची नसे । नामरुपी तुझें स्वरुप भासे ॥१॥ नाम आरामता पाउनी पठण । यापरी स्मरिजे या नांव पठण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विचारीं पां धडफुडें । देह तंव केवळ जडमूढे । कर्मसंबधन तयाकडे । केवीं लागे ॥१॥ आत्मनीं न रिघे कर्म । कर्म केवळ श्रम । थिल्लरी जेवी सोम । चळी कांपे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विटिदांडु खेळसी वांया । चौर्‍यायंशी वेरझारा होती पाया ॥१॥ नको विटिदांडु सांडीं हा छंदु । आवडी वदे रामगोविंदू ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विटिदांडु चेंडु भला रे । मनीं समजोनी मारा टोला रे ॥१॥ खेळूं विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानुं ॥१॥ कटीं पिंतांबर तुळशीचे हार । उभा सर्वेश्वर भक्तिकाजा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठठल पुडलिकासाठीं । उभा राहिला वाळुवंटीं । कर ठेवुनियां कटीं । भक्तासाठीं अद्याप ॥१॥ न कळे तयांचे महिमान । वेदां पडलेसें मौन । शास्त्रांचे भांडण । परस्परें खुटले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचें निवारी बिहो । तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ॥१॥ मना लागो त्याचा छंद । निरसोनि भेदाभेद । अवघाचि गोविंद । ठसावें हदयीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ