भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारंवार जन्म घेऊं । परी पाहूं पंढरपूर

varanvar janma gheun | pari pahun pandharapur

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वारंवार जन्म घेऊं । परी पाहूं पंढरपूर ॥१॥ दुजें मागणें देवा । करुं सेवा वैष्णवांची ॥२॥ न मागों भुक्ति आणि मुक्ति ती फजिती कोण सोसी ॥३॥ एका जनार्दनीं मागे । कीर्तनरंगी रंगला वेगें ॥४॥