भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानुं

vitevari dise svanandacha gabha | shrimukhachi shobha kay vanun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानुं ॥१॥ कटीं पिंतांबर तुळशीचे हार । उभा सर्वेश्वर भक्तिकाजा ॥२॥ लावण्य रुपडें पाहें पुडंअलीक । आणीक सम्यक नये दुजा ॥३॥ पाहतां पाहतां विश्रांती पै जाली । एका जनार्दनीं माउली संताची ते ॥४॥