भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

लावूनियां नेत्र सदा समाधिस्थ । आठवी अनंत ह्रदयामाजीं ॥१॥ नाहीं देहावरी रुपीं जाहला मग्न । नाचे उडे पूर्ण विठ्ठलनामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लाहे लाहे सोडीत गोधनें । भोंवतें गोपाळ वेष्टित तारांगणें । शोभला तो बाळवेषें परिपुर्ण । वेधु लाविला आम्हांसी तेणें वो ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

लेंकुरातें बाप खेळवी साचें । बाईल देखतां ती पुढें नाचे ॥१॥ माझां बाप माझी आई । बाईल देखतां नाचतो पायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फ़जिती होय जगीं ॥१॥ सांगतां नायके नाहीं कोणाचा धाक । पंढरीनायक धरिला मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लोह तांबे सोनें । रुपें माती पाषाण । टवाळी भिन्न भिन्न । निर्मित होती ॥१॥ वाती स्नेह भरती । पदार्थ वेगळे दिसती । परि तयामाजी ज्योती । असे एकरुप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

लौकिकापुरता नोहे हा विभाग । साधलें अव्यंग सुखसार ॥१॥ अविट विटेना बैसलें वदनीं । नाम संजीवनीं ध्यानीं मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वडील धाकुली ऐशा दोन जाया । संतान तें तया नसे काहीं ॥१॥ वडील पट्टराणी ममता तिजवरी । धाकुलीस अव्हेरी क्षणक्षणां २॥

रचनाकार: संत एकनाथ

वत्सालागीं गोप धाउनी वारसे । तैसें असो पिसें देवा ठायां ॥१॥ पाडसां चुकलीं हरीण पाहे वास । तैसी धरा आस देवा ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वदतां वदनीं अहर्निशीं राम । उपदेश सुगम सोपा मंत्र ॥१॥ दो अक्षरीं राम तेणें जोडे धाम । आणिक तो श्रम वायां जाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वंदुं अभाविक जन । ऐकावेंक साधन पावन । कलियुगीं अज्ञान । अभाविक पैं होती ॥१॥ न कळे श्रुती वेदशास्त्र । पुराण न कळे पवित्र । ज्ञान ध्यान गायत्री मंत्र । जप तप राहिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वंदें तूं अच्युत सर्वकाळ सदा । मायापाश बंध तुटोनि जाय ॥१॥ करी कां रे नेम धरीं का रे प्रेम । अच्युताचें नाम वंदे सदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वदे तोचि कल्पित शास्त्र तें शाब्दिक । पुराणा सकळिक बाष्कळचि ॥१॥ बाहुली तो जीव सुत्रधारी तो शिव । मिथ्याचि हे भाव जग सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वनमाजीं नेती गोपिका तयासीं । राम क्रीडा खेळावयासी एकांती ॥१॥ जैसा जया चित्ती हेत आहे मनीं । तैसा चक्रपाणी खेळतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वमिल्या मिष्टान्ना । परतोई श्रद्धा न धरी रसना ॥१॥ ऐसे आठवितां माझे गुण । मिथ्या ठायीं नसें ज्ञान ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ