भजनी मालिका
← भजनांकडे परत

वचन मात्रासाठी । पगटला कोरडे काष्ठीं

vachan matrasathi | pagatala korade kashthin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वचन मात्रासाठी । पगटला कोरडे काष्ठीं ॥१॥ ऐसी कृपाळु माउली । भक्तासाठीं धांव घाली ॥२॥ कृपेची कोंवळा । राखे भक्तांचा तो लळा ॥३॥ एका जनार्दनीं डोळा । पहा विठ्ठल सांवळा ॥४॥