भजनी मालिका
← भजनांकडे परत

वत्सालागीं गोप धाउनी वारसे । तैसें असो पिसें देवा ठायां

vatsalagin gop dhauni varase | taisen aso pisen deva thayan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वत्सालागीं गोप धाउनी वारसे । तैसें असो पिसें देवा ठायां ॥१॥ पाडसां चुकलीं हरीण पाहे वास । तैसी धरा आस देवा ठायीं ॥२॥ मातेलागीं चुके बाळ एकुलतें । तैसें देवापरतें न धरा मनीं ॥३॥ एका जनार्दनीं देव करा सखा । प्रपंच पारिखा सहज तेणें ॥४॥