भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाहूनिया हातीं टाळी । करुं भजन प्रेमळीं

vahuniya hatin tali | karun bhajan premalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाहूनिया हातीं टाळी । करुं भजन प्रेमळीं ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वाचे वदूं । दुजा नाहीं आम्हां छंदु ॥२॥ जाऊं पंढरीस नेमें । संतासंगें अनुक्रमें ॥३॥ पुंडलीक चंद्रभागा । दरुशनें जाय पापभंगा ॥४॥ एका जनार्दनीं स्नान । पातकें पळती रानोरान ॥५॥