भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाहे भक्तांचे उपकार । न संडी भार त्यांचा तो

vahe bhaktanche upakar | na sandi bhar tyancha to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वाहे भक्तांचे उपकार । न संडी भार त्यांचा तो ॥१॥ म्हणे इहीं थोरपण आम्हां । ऐसा वाढवी महिमा भक्तांचा ॥२॥ एका जनार्दनीं कृपाळू । दीनाचा दयाळ विठ्ठलु ॥३॥