भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठठल पुडलिकासाठीं । उभा राहिला वाळुवंटीं । कर ठेवुनियां कटीं । भक्तासाठीं अद्याप

vithathal pudalikasathin | ubha rahila valuvantin | kar thevuniyan katin | bhaktasathin adyap

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विठठल पुडलिकासाठीं । उभा राहिला वाळुवंटीं । कर ठेवुनियां कटीं । भक्तासाठीं अद्याप ॥१॥ न कळे तयांचे महिमान । वेदां पडलेसें मौन । शास्त्रांचे भांडण । परस्परें खुटले ॥२॥ नेणवे तो सोळा बारां । आणीक साहा तें अठरा । पंचविसासी पुरा । न कळे बारा छत्तिसां ॥३॥ ऐसां त्रिवाचा वेगळा । परमानंदाचा तो पुतळा । एका जनार्दनीं डोळां । देखिला देव ॥४॥