भजनी मालिका
← भजनांकडे परत

विचारावेंविवेक दृष्टी । संतचरणीं द्यावीं मिठी

vicharavenvivek drushti | santacharanin dyavin mithi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विचारावेंविवेक दृष्टी । संतचरणीं द्यावीं मिठी ॥१॥ तेणें चुके जन्मजरा । चुकवी चौर्‍यांशींचा फेरा ॥२॥ संतचरण अनुदिन । द्रुढ राखावें तेथें मन ॥३॥ एका जनार्दनीं शरण । सहज निवारे जन्ममरण ॥४॥