भजनी मालिका
← भजनांकडे परत

विचारितां तुज नामाची नसे । नामरुपी तुझें स्वरुप भासे

vicharitan tuj namachi nase | namarupi tujhen svarup bhase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विचारितां तुज नामाची नसे । नामरुपी तुझें स्वरुप भासे ॥१॥ नाम आरामता पाउनी पठण । यापरी स्मरिजे या नांव पठण ॥२॥ गर्जत नामीं जो जो शब्द उठी । शब्दानुशब्दा पडतसे मिठी ॥३॥ एका जनार्दनीं नित्य स्मरें नाम । नामरुप जाला आत्माराम ॥४॥