भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचें निवारी बिहो । तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला

viththal devadhidevo | bhaktajananchen nivari biho | to pandharicha ravo | vite ubha thakala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचें निवारी बिहो । तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ॥१॥ मना लागो त्याचा छंद । निरसोनि भेदाभेद । अवघाचि गोविंद । ठसावें हदयीं ॥२॥ स्नान केया चंद्रभागें । पातकें नासतील वेगें । संकल्प विकल्प त्याग । दरुशन घेतांची ॥३॥ ऐसा घडतां हा नेम । तयापाशी पुरुषोत्तम । एका जनार्दनीं काम । देव करी स्वयं अंगे ॥४॥