भजनी मालिका

भजने

उजळितां उजळे दीपकाची वाती । स्वयंभु ते ज्योति हिऱ्या अंगीं ॥१॥ अेकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उठतां बैसतां खेळता बोलतां । चालतांनिजतां राम म्हणा ॥१॥ आसनीं शयनी भोजनीं परिपुर्ण । वाचे राम नारायण जप करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उठले निवृति संतांच्या दरुशना । पंढरीचा प्रेमा घरा आला ॥१॥ केली प्रदक्षिणा वंदिले चरण । जाला अभिमान नामयासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उठले वैष्णव कीर्तन गजरीं । आले सिद्धेश्वरी आश्रमासी ॥१॥ पौर्णिमेपावेतों राहिले निश्चल । नेमा आतां स्थळ समाधीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उठवितां बाळ आक्रंदलें पोटीं । निघे उठाउठी चमत्कारें ॥१॥ आवसेंचा शशी तैसा राजा झाला । येरु हा निघाला कळावंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उठा पांडुरंगा प्रभातसमयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडपारी पातला ||१|| वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत सुरवरांची दादी उभे जोडूनि हात ।। २॥

उठाउठी जावों पंढरीस राहों । आनंदें क्षेत्र पाहों वि-ठ्ठलाचें ॥१॥ नाम वदनीं घ्यावो चरण ह्लदयीं ध्यावो । रूप डोळां पाहों विठ्ठालाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उठियेलें देव गोपाळ मंडळी । बैसले ते पाळी समाधीचे ॥१॥ निशीं सर्व कीर्तन वद्य माघमासीं । व्रत एकादशी गोदातीरीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उठिले विष्णव आटोपलें भोजन । केलेंअ आचमन भोगावतीं ॥१॥ अवघ्यांनीं घेतला सोपान वटेश्वर । गोंदा महादा साचार विडे देती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव