भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण

uthauthin abhiman | jay aisen sthal kon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥१॥ तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥ नेत्री अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥२॥ तुका म्हणे काला । कोठें अभेद देखिला ॥३॥