भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठा उठा हो विठोबा झडकरी चला बाहेर

utha utha ho vithoba jhadakari chala baher

रचनाकार: संत बोधले · अभंग
उठा उठा हो विठोबा झडकरी चला बाहेर । जडमुढ पाषाण यांचा करा उध्दार ॥१॥ झडकरी उठोनिया कृपादृष्टी त्वा पाहावे । आपुले प्रेमसुख आम्हा भक्तासी द्यावे ॥ २॥ तोडुनी भ्रांतीचे पडळ शुध्दबुध्द करावे । कायाकाशी पूर्णवासी स्नान धाडावे ॥३॥ प्रयाग प्रयागी पिंड देऊनी दान’ । सावध होऊनी करी गा हरिभजन ॥४॥ विश्वाचा त्रिकुट शिखरी राहे । तयाचे दर्शने जन्म पुनित होये ॥५॥ बोधला म्हणे देवा सकळ तीर्थी मी न्हालो । स्वामीच्या दर्शने जन्म पुनित जाहलो ॥६॥