भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत कोटी आमचे अपराध साहिले

anant koti amache aparadh sahile

रचनाकार: संत बोधले · अभंग
अनंत कोटी आमचे अपराध साहिले । तु आमची माउली पांडुरंगा ॥१॥ तुज परत जिवलग नाही त्रिभुवनी । तु आमची जननी पांडुरंगा ॥२॥ अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या रासी । बापा हृषीकेसी पांडुरंगा ॥३॥ बोधला म्हणे तुज काये होऊ उतराई। तू आमचा मायबाप तू पांडुरंगा ॥४॥