भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंत जन्माचे फेडिले सांकडे

anant janmache phedile sankade

रचनाकार: संत बोधले · अभंग
अनंत जन्माचे फेडिले सांकडे । चुकविले कोडे चौऱ्यांशिचे ॥१॥ चौऱ्यांशिचा फेरा सोशी येरझारा । चुकवी दातारा पांडुरंगा ॥२॥ बोधला म्हणे एक बरे केले । खत हे फाडिले जन्मांतरीचे ॥३॥