भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठवितां बाळ आक्रंदलें पोटीं । निघे उठाउठी चमत्कारें

uthavitan bal akrandalen potin | nighe uthauthi chamatkaren

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उठवितां बाळ आक्रंदलें पोटीं । निघे उठाउठी चमत्कारें ॥१॥ आवसेंचा शशी तैसा राजा झाला । येरु हा निघाला कळावंत ॥२॥ आळवावा तरी धाक बाईलेचा । तेणें त्याची वाचा चाकाटली ॥३॥ ह्रदय फुटलें प्रेमही दाटलें । तरी काय चाले तियेपुढें ॥४॥ सूर्यासी पडेल निधनासी भूत । तैसी झाली मात राजयासी ॥५॥ नामा म्हणे मोह खोटा हा दुर्धर । त्यागावा निर्धार वेदांतीच्या ॥६॥