भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठले वैष्णव कीर्तन गजरीं । आले सिद्धेश्वरी आश्रमासी

uthale vaishnav kirtan gajarin | ale siddheshvari ashramasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उठले वैष्णव कीर्तन गजरीं । आले सिद्धेश्वरी आश्रमासी ॥१॥ पौर्णिमेपावेतों राहिले निश्चल । नेमा आतां स्थळ समाधीसी ॥२॥ निवृत्ती मुक्ताई संगें आला चांगा । म्हणती पांडुरंगा उठा आतां ॥३॥ ज्ञानदेवासाठीं उत्सव आळंकापुरीं । तैसा कर्‍हेतीरीं सोपानासी ॥४॥ तैसी चांगयाची पुरवावी आळी । नामा वनमाळी उठावले ॥५॥