भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठले निवृत्ति संतांच्या दर्शना

uthale nivrutti santanchya darshana

उठले निवृत्ति संतांच्या दर्शना । पंढरीच्या प्रेमा घरा आला ॥१॥ केली प्रदक्षिणा वदिले चरण । झाला अभिमान नामवासी ॥२॥ देवाजवळी आम्ही निरंतर । यासी अधिकार नमस्कारा ॥३॥ नित्य समागम हरिच्या चरणी । हे आणि आम्ही देवभक्त ॥४॥ नामा म्हणे काय वंदू यांचे । चरण अंगे परब्रह्म मजपाशी ॥५॥