भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठा उठा हो विठोबा आता उजेड जाहला

utha utha ho vithoba ata ujed jahala

रचनाकार: संत बोधले · अभंग
उठा उठा हो विठोबा आता उजेड जाहला । सांभाळा आपुली बाळे तु बापा विठ्ठला ॥ १॥ दिन उगवला बाळे भुकेली जाहली । दयाळू माऊली सकळा भोजन घाली ॥ २॥ सकळांसी सांभाळूनी घ्यावे त्वा अन्न । दयाळू होऊनी लावी आपूले ध्यान ॥३॥ बोधला म्हणे देवा मी तो बाळ अज्ञान अखंड । मग देई तुझे नाम स्मरण ॥४॥