भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठले निवृति संतांच्या दरुशना । पंढरीचा प्रेमा घरा आला

uthale nivruti santanchya darushana | pandharicha prema ghara ala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उठले निवृति संतांच्या दरुशना । पंढरीचा प्रेमा घरा आला ॥१॥ केली प्रदक्षिणा वंदिले चरण । जाला अभिमान नामयासी ॥२॥ देवाचे जवळी आम्ही निरंतर । यासी अधिकार नमस्कारा ॥३॥ नित्य समागम हरिच्या चरणीं । हे आणि आम्हीं देवभक्त ॥४॥ नामा म्हणे कांये वंदू यांचे चरण । अंगें परब्रह्म मजपाशीं ॥५॥