भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठतां बैसतां खेळता बोलतां । चालतांनिजतां राम म्हणा

uthatan baisatan khelata bolatan | chalatannijatan ram mhana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उठतां बैसतां खेळता बोलतां । चालतांनिजतां राम म्हणा ॥१॥ आसनीं शयनी भोजनीं परिपुर्ण । वाचे राम नारायण जप करीं ॥२॥ कार्याकारणीं समाधीं उन्मनीं । राम ध्यानींमनीं जपे सदा ॥३॥ एकांती लोकांती देहत्यागांअंती । रामनाम वस्ती जिव्हेवरी ॥४॥ एका जनार्दनीं वाचे वदे राम । अखंड निष्काम होसी बापा ॥५॥