भजनी मालिका

भजने

मजूर राऊळाचें वृत्त नेतां । तो तुरंगीं चढे मनोरथा ॥१॥ सबळ वारुवांचे उड्डाण । म्हणोनि उडों जात आपण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें ॥१॥ तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मति माझी लागो सोपनाचरणीं । रात्रंदिवस चिंतनी जप सदा ॥१॥ आणीक न करीं दुजा नेम धर्म । सर्व सोपें वर्मं सोपानदेवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मतिविण काय वर्णु तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती ॥१॥ करूनि गोजिरा आपुलिये मती । धरियेलें चित्तीं चरणकमळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥१॥ आशौच तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मंत्रतंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥१॥ राम कहे त्यागे पगहूं लागूं । देखत कपट अभिमान दुर भागूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मंत्रतंत्राची कथा कोण । गाइत्री मंत्र विकिती ब्राह्मण ॥१॥ ऐसा कलीमाजीं अधर्म । करिताती नानाकर्में ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मंत्रयंत्र दीक्षा सांगातील लक्ष । परि रामा प्रत्यक्ष न करी कोण्ही ॥१॥ प्रत्यक्ष दावील रामा धरीन त्याचे पाय । आणिकांचीं काय चाडा मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मंत्राचा पैं मंत्र हरी हरी उच्चार । न लागे तो विचार करणें कांहीं ॥१॥ सुफळ नाम गाढें वाचेसि उच्चारुं । केशव हाचि करुं सर्वांभूतीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मंत्रामाजीं मंत्र विठ्ठल त्रिअक्षरीं । जपतां निर्धारीं सुख होय ॥१॥ म्हणोनियां करा लागपाठ बळें । संसारीं अंधळे होऊं नका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मत्सर ज्ञानीयातें न सोडी । मा इतर कायसीं बापुडीं ॥१॥ शिणताती मत्सरवेधे । भोगिताती भोग विविधें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मत्स्य कच्च क्रोड मृग ते खुजट । जेथूनि प्रगट झालीं रूपें ॥१॥ तेंचि ब्रह्म उभें भिंवरेच्या तिरीं । हात कटावरी ठेवू-नियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथ्वीचा भार वाहावया ॥१॥ काय धाक आम्हां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मंथना आरंभ करीतसे राधा । आठवी गोविंदा मना-माजी ॥१॥ मेळवोनी मुलें खेळे तिचे द्वारीं । देखिला श्रीहरी राधि-केनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव