भजनी मालिका
← भजनांकडे परत

मतिविण काय वर्णु तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती

mativin kay varnu tujhen dhyan | jethen padilen maunya vedashruti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मतिविण काय वर्णु तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती ॥१॥ करूनि गोजिरा आपुलिये मती । धरियेलें चित्तीं चरणकमळ ॥ध्रु.॥ सुखाचें ओतिलें पाहों ते श्रीमुख । तेणें हरे भूक तान माझी ॥२॥ रसना गोडावली ओव्या गातां गीत । पावलेंसे चित्त समाधान ॥३॥ तुका म्हणे माझी दृष्टि चरणांवरी । पाउलें गोजिरीं कुंकुमाचीं ॥४॥