भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंत्रामाजीं मंत्र विठ्ठल त्रिअक्षरीं । जपतां निर्धारीं सुख होय

mantramajin mantra viththal triaksharin | japatan nirdharin sukh hoy

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मंत्रामाजीं मंत्र विठ्ठल त्रिअक्षरीं । जपतां निर्धारीं सुख होय ॥१॥ म्हणोनियां करा लागपाठ बळें । संसारीं अंधळे होऊं नका ॥२॥ संसारसागर भरला दुस्तर । विठ्ठल पैलपार नौका जगीं ॥३॥ तापत्रयें तापली भवार्णवीं पीडिली । तयां विठ्ठलवली प्रकाशली ॥४॥ जाणिवेचे डोहीं नको पडुं फेरे । विठ्ठल उच्चारें कार्यसिद्धि ॥५॥ एका जनार्दनीं विठ्ठलाची आण । दुजा तारी कोण मज सांगा ॥६॥