भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंथना आरंभ करीतसे राधा । आठवी गोविंदा मना-माजी

manthana arambh karitase radha | athavi govinda mana-maji

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मंथना आरंभ करीतसे राधा । आठवी गोविंदा मना-माजी ॥१॥ मेळवोनी मुलें खेळे तिचे द्वारीं । देखिला श्रीहरी राधि-केनें ॥२॥ विसरोनी मंथन रित्या डेरीयांत । रवी फिरवित गरगरां ॥३॥ डेरा खडबडां वाजतं ऐकोन । वृद्धा ते धांवोन बाहेर आली ॥४॥ सासू म्हणे काय गेले तुझे नेत्र । देतसे उत्तर राधा तीसी ॥५॥ डेरा धड किंवा फुटका म्हणुनी । रवी घुसळोनी पाहातसें ॥६॥ वृद्धा म्हणे तुझें चित्त नाहीं स्थीर । द्वारीं हो श्रीधर देखियेला ॥७॥ रागें भरोनियां बोलत म्हातारी । येथें कांरे हरी खेळसी तूं ॥८॥ कृष्ण ह्मणे आह्मीं खेळतों बिदिशीं । तूं कां दटाविसी थेरडिये ॥९॥ ऐसें बोलेनियां श्रीहरी पळाला । घरासी तो गेला नामा ह्मणे ॥१०॥