भजनी मालिका

भजने

मग हळूचि बोले अमृतवाणी । मागा म्हणोनी निजभक्तां ॥१॥ मुक्त होईन सेवाऋणा । घ्या हो वरदाना इच्छेच्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग होसोनियां बोलिजे कृष्णें । बेटे हो तुम्ही अवघेचि शहाणे । सर्पे गिळिले होतेती प्राणें । कैसे तरी वांचलेती ॥१॥ बरें झालें हातों मागें । तेणें वांचलेतीरे प्रसंगे । पैल पहारे महाभुजंगे । चिरुनी सांडिला त्याच्या फाळी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मंगळवेढयाभोंवतें कुसूं घालावया । महारासी न्यावया दूत आले ॥१॥ महारासमागमें चोखा मेळा गेला । काम तें लागला करावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मच्छरुप धरुनी शंखासुर मारिला । तेव्हां श्रमोनी जघनीं कर ठेविले ॥१॥ कूर्मरुप धरुनी पृथ्वी धरलीं पृष्ठीं । तेणें श्रमोनी कर ठेविले कटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मच्छिंद्रानें मंत्र गोरक्षासीदिला । गोरक्ष वोळला गहिनीराजा ॥१॥ गहिनीनें खूण निवृत्ति दिधली । पूर्ण कृपा केली ज्ञानराजा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मज ऐसें कोण उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥१॥ हातींच्या कांकणां कायसा आरिसा । उरलों मी जैसा तैसा आहें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम