भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रुमा

mangalamurti sukhadhama | bhaktanchiya kalpadruma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रुमा । निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥ विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा । भरित दाटलें अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥ मति चालविली रसाळ । संत श्रोतिया केला सुकाळ । दिधलें पुरुषार्थाचें बळ । तें तूं केवळ संजीवन ॥३॥ अमृतानुभव आनंदलहरी । ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी । संस्कृत प्राकृत वैखरी । वदविली माझी ॥४॥ आतां मोक्षाचिया वाटा । पाहिला षड्रचक्र चोहटा । आज्ञा द्यावी वैकुंठा । ज्ञानदेव म्हणे ॥५॥