भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंगळवेढयाभोंवतें कुसूं घालावया । महारासी न्यावया दूत आले

mangalavedhayabhonvaten kusun ghalavaya | maharasi nyavaya dut ale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मंगळवेढयाभोंवतें कुसूं घालावया । महारासी न्यावया दूत आले ॥१॥ महारासमागमें चोखा मेळा गेला । काम तें लागला करावया ॥२॥ सर्वकाळ वाचे विठ्ठलनाम छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥३॥ चार महिने याचि रीतीनें लोटिले । कुसूं कडाडिलें अकस्मात्‌ ॥४॥ तयाखालीं महार बहु चूर झाले । चोख्यानें अर्पिले प्राण देवा ॥५॥ देव म्हणे नाम्या त्वां जावें तेथें । त्याच्या अस्थि येथें घेऊनि याव्या ॥६॥ नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या । विठ्ठलनाम जयामध्यें निघे ॥७॥