भजनी मालिका

भजने

भोळे ते साबडे गोपिका ते भावें । चुंबन बरवें देती तया ॥१॥ यज्ञमुखीं तोंड करी जो वाकुंडें । तो गोपिकांचे रोकडें लोणी खाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसें केलें भक्तिभावें ॥१॥ म्हणउनि चिंता नाहीं आम्हां दासां । न भ्यो गर्भवासा जन्म घेतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भोंवतालें जाळें घाली नेटेंपाटें । हस्तकीं तिखट बाण धरी ॥१॥ येतील उदकपानासी सावजें । पाहे त्याचे व्याजें रोखोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भ्याला देव देखोनि भक्तां । म्हणे मी आतां केउता पळों ॥१॥ जीवेंसीचि इहीं केली साठी । सांडवितां मिठी न सोडिती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो ॥१॥ आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भ्रतरा हो मजसी चोदतो येकांती भोगावे मजसी म्हणुनीया ।।१।। ओदोनीया बहुत मारीतो मजसी मध्यरात्री जाणा समयासी ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥१॥ अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भ्रम धरुनियां वायां कासया खेळसी भोवरां । यम मारी कुच्चा फिरशील चौर्‍याशीं घरां ॥१॥ पुढे शुद्धी करीं वाचें स्मरे हरी । वायां भ्रमें फिरशी गरगरां पडसी मायाफेरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भ्रमण न करितां भागलों जी देवा । न मिळे विसावा मज कोठें ॥१॥ लागलेंसे कर्म आमुचे पाठारीं । आतां कोणावरी बोल ठेऊं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भ्रमना पाउलें वेचताती तीं वाव । प्रवेशतां ठाव एक द्वार ॥१॥ सार तीं पाउलें विठोबाचीं जीवीं । कोणीं न विसंभावीं क्षणभरि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम