भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोवंडींसरिसें । अवघें भोंवत चि दिसे

bhovandinsarisen | avaghen bhonvat chi dise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोवंडींसरिसें । अवघें भोंवत चि दिसे ॥१॥ ठायीं राहिल्या निश्चळ । आहे अचळीं अचळ ॥ध्रु.॥ एक हाकेचा कपाटीं । तेथें आणीक नाद उठी ॥२॥ अभ्र धांवे शशी । तुका असे ते तें दुसरें भासी ॥३॥