भजनी मालिका

भजने

मग बैसवूनियां पाटावरी । ताटीं वाढिल्या नानापरी । दूध दहीं तूप साय वरी । शर्करा तेही ठेवियेली ॥१॥ कृष्ण म्हणे कालवी आतां । जेववीं मज तें वो जेवितां । येरी म्हणे परिसें ताता । रुचि त्याच्या भिन्न भिन्न ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग बोले मंजुळा उत्तरी । मज न्या जी गोकुळाभितरी । ठेवुनी नंदयशोदेच्या घरी । तुम्हीं यावे तेच क्षणी ॥१॥ ऐकोनी तयाचे उत्तर । वसुदेव विस्मित आणि चिंतातूर । म्हणे कैसा करावा विचार । बंधने गोविलें मजलागी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग म्हणती अवघ्या जणी धांवोनि पहागे आणा पाणी । डास वरखडला न्याहाळुनी । रक्त कोठुनी स्त्रवलें हो ॥१॥ पहाती तंव तो उत्तम अंगे । जेंवि का उठियलें अनंगे । नभापरी अलिप्त संगे । काय करिती अघात त्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग म्हणे गडियां आपण । उचलूं चला गोवर्धन । तयातळीं सकळही जन । घालुनियां संरक्षूं ॥१॥ मग ते उभे करुनि फेरी । धरविला त्यांचे हातें गिरी । आपणही तेथें निमित्यावरी । एकी आंगोळी लावियली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग म्हणे गिळिले गोप । गाई खिल्लारांचे कळप । तारि हा चिरुनियां सांडीन सर्प । घेईन सूड या सकळांचा ॥१॥ कृष्ण शिरतीं त्याच्या वदनी । अधासुरा हर्ष न समाय मेदिनी । म्हणे कार्य साधिलें हा चक्रपाणी । गिळिलियावरी सर्व माझे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग लाउनी शिंकियाच्या हारी । बैसल्या जागत आपुल्या घरीं । कवडाआड आणि माजघरीं । शिंकिया जवळी भोंवताल्या ॥१॥ पाटीये तळीं झांकोनी दीप । बैसल्या दवडोनियां झोंप । तंव हा सच्चिदानंदस्वरुप । आला चोरिये त्याचि घरां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग लावूनियां नेत्र निर्धारु पैं केला । ह्र्दयीं आठविला केशीराज ॥१॥ तूं इष्ट मित्र बंधु सोयरा जननी जनकु । नेणें मी आणिकु तुजवांचोनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मग लेइले दिव्य अळंकार । उभयतांहि बंधु अति नागर । मुगुट कुंडले एकावळी हार । झळकती पदकें जडितांची ॥१॥ बाहूभूषणें वीरकंकणें । मुद्रिका अंगुळिया शोभल्या लेणें । वेष्टुनी पितांबराची परिधानें । घेतली निशाणें निजकरीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग वस्त्रें देउनी गौरविला । रायें बहूत सन्मानिला । चालतां मार्गी विचार सुचला । म्हणे टाकवीन तान्हुला निर्जनी ॥१॥ टिळे माळा टोपी शिरीं । श्रीमुद्रांची वोळी पंचांग करी । धोकटी घेउुनीयां खादियावरी । शुध्द मुहूतें चालिला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग वेदाचा आरंभ करिता जाला पशू । विधी उपन्यासू सांग पढे ॥१॥ करिती आश्चिर्य सकळ द्विजवर । हे तीहीं अवतार तीन देवांचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मग संतोष जाला हरिभक्तां । ज्ञानदेव झाला बोलता । निवृत्तीसी म्हणे तुम्ही जावें आतां । त्र्यंबका सीखरीं ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

मग सांगे गडियां सुजाणां । जातां कावडीं हिरोनि आणा । काय करितो देवराणा । पाहों चरित्र देवांचे ॥१॥ सें सांगोनियां गडियांसी । प्रात:काळींचि हषिकेशी । जाऊनियां मार्गप्रदेशीं । रोखूनियां बैसला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग सांगें गुह्य गोष्टी । मामा पाचारितो भेटी । इतुकेंचि ऐकोनियां पोटीं । कृष्णा आनंद न समाय ॥१॥ मग म्हणे बळिरामासी । जाऊं मामाचिये भेटीसी कृप करुनियां अक्रूरासी । मूळ आम्हांसी पाठविला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मग साधुसंत म्हणती विठ्या जाय । मम तूं याचे पाच सोडूं नको ॥१॥ अठ्ठाविस युगें एकाचें धरणें । तेथें हें नामणें दुसरें कोठें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव