भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग वेदाचा आरंभ करिता जाला पशू । विधी उपन्यासू सांग पढे

mag vedacha arambh karita jala pashu | vidhi upanyasu sang padhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग वेदाचा आरंभ करिता जाला पशू । विधी उपन्यासू सांग पढे ॥१॥ करिती आश्चिर्य सकळ द्विजवर । हे तीहीं अवतार तीन देवांचे ॥२॥ आदिमाया मुक्ताई मुक्तपणें अवतरली । आम्हांपासुनि जाली थोर चुकी ॥३॥ कर्मठ अभिमानें ठकलों देहबुद्धि । गोवियेलों विधि निषेधाच्या ॥४॥ नेणों भक्तिज्ञान वैराग्याचा लेश । कुटुंबाचे दास होऊनि ठेलों ॥५॥ आणिकांसी सांगों आपण नाचरों । लटिकेच हुंबरों प्रतिष्ठेसी ॥६॥ धन्य यांचा वंश धन्य यांचे कुळ । धन्य पुण्यशील अवतार हे ॥७॥ सकळ द्विजवर करिती नमस्कार । आनंदें जयजयकार करिताती ॥८॥ ज्ञानदेव म्हणे तुमच्या पायांचा महिमा । सामर्थ्य हे आम्हां अंगीं नाहीं ॥९॥