भजनी मालिका

भजने

मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥१॥ कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥ कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ता वाटतसें ॥१॥ याचा कांहीं तुह्मीं देखावा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥१॥ तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥ न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मजसाठीं काय लाजतोसी देवा । तृणा आणि जीवा साच होसी ॥१॥ ते काय पवाडे गमाविलों ब्रीदें । ब्रह्मादिकें वृंदें ध्याती कैसीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मजसि जेणें विकिलें शरीर । जाणें मी निर्धारें अंकित त्याचा ॥१॥ त्याचें सर्व काम करीन मी अंगें । पडों नेदीं व्यंगें सहासा कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ