भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजसि जेणें विकिलें शरीर । जाणें मी निर्धारें अंकित त्याचा

majasi jenen vikilen sharir | janen mi nirdharen ankit tyacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मजसि जेणें विकिलें शरीर । जाणें मी निर्धारें अंकित त्याचा ॥१॥ त्याचें सर्व काम करीन मी अंगें । पडों नेदीं व्यंगें सहासा कोठें ॥२॥ एका जनार्दनीं त्याचा मी अंकित । राहे पैं तिष्ठत त्याचे द्वारीं ॥३॥