भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार

maj nahin dhir | tumhi na kara angikar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार ॥१॥ ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥ चालों नेणें वाट । केल्या न पवाची बोभाट ॥२॥ वेचों नेणे जीवें । तुका उदास धरिला देवें॥३॥