भजनी मालिका
← भजनांकडे परत

मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें

majashin pure na pade vaden | sukh dohinchya sanvaden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥१॥ तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥ वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥२॥ तुका म्हणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥३॥