भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा

maj pahatan hen latiken sakal | kothen mayajal davin deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥१॥ कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥ काढा जी मोह बुंथा जाळ । नका लावूं बळें वेड आम्हां ॥२॥ जीव शिव कांही ठेवियेलीं नांवें । सत्य तुम्हां ठावें असोनियां ॥३॥ सेवेच्या अभिळासें न धरा चि विचार । आम्हां दारोदार हिंडविलें ॥४॥ आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥५॥ तुका म्हणे काय छायेचा अभिळासे । हंस पावे नाश तारागणीं ॥६॥