भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग बैसवूनियां पाटावरी । ताटीं वाढिल्या नानापरी । दूध दहीं तूप साय वरी । शर्करा तेही ठेवियेली

mag baisavuniyan patavari | tatin vadhilya nanapari | dudh dahin tup say vari | sharkara tehi theviyeli

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग बैसवूनियां पाटावरी । ताटीं वाढिल्या नानापरी । दूध दहीं तूप साय वरी । शर्करा तेही ठेवियेली ॥१॥ कृष्ण म्हणे कालवी आतां । जेववीं मज तें वो जेवितां । येरी म्हणे परिसें ताता । रुचि त्याच्या भिन्न भिन्न ॥२॥ येरु म्हणे रसनायक । भिन्न कैंचे वो आणिक । येरी म्हणे तुझी एकैक । नवाईच शब्दाची ॥३॥ मग कालवूनि एके ठायीं । म्हणें कृष्णा आतां घेंई । येरु म्हणे वेगळें देंई । करुनियां हें ठायीचें ॥४॥ तंव ते म्हणे न चले युक्ती । नको छळुं रे श्रीपती । त्यांची एकत्र करविलें अंती । मज कां म्हणसीं निवडी हें ॥५॥ ऐसें कोणा आहे ज्ञान । मिश्रित झालें तें करी भिन्न । येरें पालवें झांकून । दाविले पदार्थ वेगळाले ॥६॥ निळा म्हणे देखोनिया माता । आश्रचर्य मानी ते तत्वतां । म्हणे याचिये हातीं सर्वहि सत्ता । आहे सकळ विश्रवाची ॥७॥