भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रमण न करितां भागलों जी देवा । न मिळे विसावा मज कोठें

bhraman na karitan bhagalon ji deva | na mile visava maj kothen

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
भ्रमण न करितां भागलों जी देवा । न मिळे विसावा मज कोठें ॥१॥ लागलेंसे कर्म आमुचे पाठारीं । आतां कोणावरी बोल ठेऊं ॥२॥ सांपडलों वैरियाचे भांडवली । न कळे चिखलीं रोवियेलों ॥३॥ चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा । तुम्हाविण फांसा उगवी कोण ॥४॥