भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रमर रस द्वंद्व विसरला भूक

bhramar ras dvandva visarala bhuk

भ्रमर रस द्वंद्व विसरला भूक । त्याहुनी एथें सुख अधिक दिसे ॥१॥ जंववरि भुली तंववरी बोली । समुद्रींचि खोली विरळा जाणे ॥२॥ आशापाश परि निवृत्ति तटाक । पडियेले ठक चिद्रूप रुपीं ॥३॥ प्रकाश हरीचा प्रकाशला देहीं । नेणतीच कांही मूढजन ॥४॥ ऐलतीरीं ठाके पैलतिरीं ठाके । तेथें कैसेनि सामर्थे पाहों आतां ॥५॥ जाणिव शाहाणिव तूंचि निवृत्ति देवा । हरि उभय भावा ज्ञान देसी ॥६॥ ज्ञानदेवा शांति उन्मनि रहस्य । हरिरुप भाष्य करविलें ॥७॥ बापरखुमादेविवरविठ्ठल ह्रदयीं । आलिंगितां बाही भ्रमर जाला ॥८॥