भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोंवतालें जाळें घाली नेटेंपाटें । हस्तकीं तिखट बाण धरी

bhonvatalen jalen ghali netempaten | hastakin tikhat ban dhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भोंवतालें जाळें घाली नेटेंपाटें । हस्तकीं तिखट बाण धरी ॥१॥ येतील उदकपानासी सावजें । पाहे त्याचे व्याजें रोखोनियां ॥२॥ तेथें एक बिल्ववृक्ष महाथोर । वेंघोनियां वर बैसलासे ॥३॥ डोळ्याआड आलीं ह्मणोनियां तोडी । अंतरीं आवडी आमीषाची ॥४॥ बकाचियेपरी ध्यानस्थ राहिला । जीविंचा जिव्हाळा वेगळाची ॥५॥ नामा ह्मणे ऐसी दैवाची नव्हाळी । न करितां झाली देवपूजा ॥६॥