भजनी मालिका
← भजनांकडे परत

मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें

madhen jhankuniyan kariti perani | kunabiyache vani lavalahen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें ॥१॥ तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥ ओटीच्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥२॥ नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥३॥ तुका म्हणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥४॥