भजनी मालिका

भजने

मन मनासी होय प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभिमान ॥१॥ पावोनि गुरुकृपेची गोडी । मना मन उभवी गुढी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥ आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मन माझें चोरटें लागलें कुसंगीं । बांधिलें षड्‌वर्गीं धरोनि त्यातें । केउता गेलासि माझ्या कृपावंता । ये गा पंढरिनाथा मायबापा ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

मन माझें बैसलें ध्यानीं । तुमचे चिंतनीं नामाचिये ॥१॥ ऐक्यासनिं स्थिरावलें । आठवी पाऊलें निरंतरत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मन माझें लागो सोपानचरणीं । मस्तक हें धणी पायांवरी ॥१॥ सोपान सोपान जपेन हें नाम । अन्य न करीं नेम दुजा कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मन माझें वेधलें मन माझें वेधलें । पहातां भलें सच्चिदानंद ॥१॥ आनंदीआनंद मनासी पैं झाला । देखिला सांवळा पाडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मन मारुनि डोळां लेईलें । काळेपणें मिरवलें रुप त्यांचें ॥१॥ बरवें हें रुप काळें अमोलिक । म्हणोनि सांग जें शुध्दभावें ॥२॥

मन मुरडोनि डोळां लेइलें । काळेपणें मिरवलें रुप त्याचें ॥१॥ बरवें रुप काळें अमोलिक । म्हणोनियां सांगतसे शुध्द भावें ॥ध्रुव॥

मन रामीं रंगलें अवघें मनचि राम जालें । सबाह्म अभ्यंतरीं अवघें रामरुप कोंदलें ॥ध्रु०॥ चित्तचि हारपले अवघें चैतन्यचि जालें । देखतां देखतां अवघें विश्वा मावळलें ।

रचनाकार: संत एकनाथ