भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं

man majhen chapal na rahe nishchal | ghadi eki pal sthir nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥ आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥ धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥२॥ तुका म्हणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥३॥