भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन मुरुऊनी करी राज रया

man muruuni kari raj raya

मन मुरुऊनी करी राज रया । प्रणवासी सखया साक्ष होई ॥१॥ देहीं स्थानमान विवरण करीं आधीं । पिंडींची ही शुध्दि प्रथम करी ॥२॥ औट हात हा देह ब्रह्मांड सगळें यांत । तयाचा निश्चित शोध करा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे विवरण करी वेगे । निवृत्तिच्या संगे साधिलें हेचि ॥४॥