भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन माझें लागो सोपानचरणीं । मस्तक हें धणी पायांवरी

man majhen lago sopanacharanin | mastak hen dhani payanvari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मन माझें लागो सोपानचरणीं । मस्तक हें धणी पायांवरी ॥१॥ सोपान सोपान जपेन हें नाम । अन्य न करीं नेम दुजा कांहीं ॥२॥ वारी पां सांकडें प्रपंच काबाड । घालूनियां आड नामशास्त्र ॥३॥ जीवींच्या जीवना माझिया सोपाना । एका जनार्दनी अभय द्यावें ॥४॥