भजनी मालिका
← भजनांकडे परत

मंत्रयंत्र दीक्षा सांगातील लक्ष । परि रामा प्रत्यक्ष न करी कोण्ही

mantrayantra diksha sangatil laksha | pari rama pratyaksha na kari konhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मंत्रयंत्र दीक्षा सांगातील लक्ष । परि रामा प्रत्यक्ष न करी कोण्ही ॥१॥ प्रत्यक्ष दावील रामा धरीन त्याचे पाय । आणिकांचीं काय चाडा मज ॥२॥ सर्व कामीं राम भेटविती मातें । जीवेंभावें त्यांतें ओवाळीन ॥३॥ नामा म्हणे आम्हां थोर लाभ जालाअ । सोईरा भेटला अंतरींचा ॥४॥